जयपूर (वृत्तसंस्था) कोणत्याही विमानतळावर एखादी वस्तू परदेशातून आणली असल्यास त्या वस्तुची कस्टम ड्युटी भरली नसेल तर संबंधितांवर कारवाई केली जाते. मात्र काहीवेळा प्रश्न पडावा असा वस्तूही सापडतात. जयपूर विमानतळावर आयपीएस अरुण बोथरा यांची बॅग तपासण्यात आली. त्यात जे सापडलं त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. दरम्यान त्यांच्या बॅगेत हिरव्या वाटाण्याच्या शेंगा (मटार) मोठ्या प्रमाणावर आढळल्या.
आयपीएस बोथरा यांना जयपूर विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी त्यांची बॅग उघडण्यास सांगितली. दरम्यान त्यांच्या बॅगेत हिरव्या वाटाण्याच्या शेंगा (मटार) मोठ्या प्रमाणावर आढळल्या. त्यांनी याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला असून त्याचे मीम्स व्हायरल होत आहेत. आयपीएस अरुण बोथरा हे परिवहन आयुक्त म्हणून ओडिसामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांची बॅग उघडलेली दिसत असून हिरव्या वाटण्याच्या शेंगांनी ती भरलेली दिसत आहे. ज्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या बॅगेत हिरव्या वाटाण्याच्या शेंगाची भाजी पाहिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. अरुण बोथरा यांनी सांगितले की, या शेंगा त्यांना ४० रुपये किलो इतक्या दराने खरेदी केल्या.