जळगाव (प्रतिनिधी) भाजपतर्फे ओबीसी उमेदवार देण्यात येतील अशी घोषणा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर अॅड. रोहिणी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?, असा सवाल अॅड. रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलाय.
त्यांनी म्हटले की, भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?….आता गळा काढण्यात अर्थ नाही. अॅड. रोहिणी खडसे यांनी ट्विट करून फडणवीस यांना धारेवर धरले.
दुसरीकडे त्यांच्या भावजय भाजप खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतत्वाखाली उद्या ओबीसी आरक्षण रद्द करू नये, या मागणीसाठी जळगावात चक्का जाम आंदोलन आहे. रक्षा खडसे या भाजपतर्फे आयोजित ओबीसी बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होत्या, त्यांना भाजप ओबीसी चेहरा म्हणून पाहत आहे.