बुलढाणा (वृत्तसंस्था) खामगाव पाणी तापविण्यासाठी लावलेल्या हिटरचा शॉक लागून ३२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना जलंब येथे २ ऑगस्ट रोजी घडली. रेखाबाई ज्ञानेश्वर मोहे, असे मयत महिलेचे नाव आहे.
जलंब येथील रेखाबाई ज्ञानेश्वर मोहे ही महिला २ ऑगस्ट रोजी दुपारी शेतातून घरी आली. अंघोळीसाठी त्यांनी घरात आल्यावर पाणी गरम करण्यासाठी हिटर लावले. परंतु अचानक त्यांना हिटरचा शॉक लागल्याने त्या जागीच कोसळल्या. ही दुर्घटना लक्षात येताच नातलगांनी त्यांना त्वरित उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतू वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.















