भुसावळ (प्रतिनिधी) प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीला शिवीगाळ दमदाटी मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्थानकात मनोज रविंन्द्रन पिल्लई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरण्या एस पिल्लई असे मयताचे नाव आहे.
यासंदर्भात धनुजा मेझुवाना कार्थीयायनीउ (वय ५५, पुलियूर आलपुझा राज्य केरळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोज रविंन्द्रन पिल्लई (रा. मनोज भवन पो वेणमणी ता चेन्गनुर. जि आलपुझा राज्य केरळ ह मु भुसावळ) याने त्याचे ओळखीची मुलगी रेम्या हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधात त्यांची पत्नी शरण्या एस पिल्लई ऊर्फ शरण्या मनोज पिल्लई हिने आडकाठी केली. त्याचे वाईट वाटून मनोज पिल्लई हा नेहमी पत्नी शरण्या हिला शिवीगाळ दमदाटी मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ केला. त्या जाचास कंटाळून त्याची पत्नी शरण्या हिने दि. २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ०३:४५ वाजेच्या पुर्वी वेळ नक्की नाही तिचे राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तसेच तिचे मृत्युस तिचा पती मनोज रविंन्द्रन पिल्लई हाच कारणीभुत असून त्याने त्याची पत्नी व यातील मयत शरण्या हिस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्थानकात मनोज रविंन्द्रन पिल्लई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सपोनि प्रकाश वानखडे हे करीत आहेत.