पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील उषाबाई पंडित सेनर (न्हावी) वय ६४ यांचे दि. २३ मार्च २०२१ रोजी पहाटे २.३० वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी पिंप्री येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघाली. त्यानंतर वैकुंठधाम वर अडीच वाजता अग्नीडाग देत नाही तोपर्यंत तिच्या पती पंडित लोटन सेनर (न्हावी) वय ७० यांनी जगाचा निरोप घेतला.
गावातील गरीब कुटुंब व मनमिळावू स्वभाव असल्याने गावात अत्यंत दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या पाश्च्यात दोन मुलं, तीन मुली, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे. ते प्रवीण पंडित सेनर व चंद्रकांत पंडित सनेर यांचे वडील होते. हिम्मत व बापू वामन न्हावी यांचे बहिण पाहुणे होते.
















