मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात करोनाचा कहर सुरु असून ठाकरे सरकरकडून लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहे. राजकीय पक्षासोबत प्रसिद्ध उद्योजकांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनसंबंधी महत्वाची माहिती दिली आहे. राजेश टोपे म्हणाले कि, चित्रपटगृह १०० टक्के बंद करावे लागतील का? गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या हेतूने या काही गोष्टी कराव्या लागतात. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
“ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत तेव्हा वाढणारे रुग्ण, आपल्याकडे असणारी संसाधनं या सगळ्याचं आपण मोजमाप करत राहतो. वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणं यंत्रणेची गरजच असते. त्यामुळे लॉकडाउन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाउन करत नसतो. तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फर्निसिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
“लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून, परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेतला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. रुग्णसंख्या वाढणं चिंतेचा विषय आहे. लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लोकांचा निर्धास्तपणा हा त्याचं मुख्य कारण आहे. कोणत्याही परिस्थितीत जे निर्बंध सांगितले आहेत ते पाळले जावेत अशी सरकारला जनतेकडून अपेक्षा आहे. लग्नाला गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग गोष्टींचं पालन केलं पाहिजे,” असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
“मी अलीकडे जे पाहत आहे तिथे लक्षणं नसणाऱ्यांची काळजी वाटत नाही. पण ते होम कवारंटाइन असतात, बऱ्याच लोकांना छोटी घरं असतात. त्यामुळे ते आपल्यासोबत संपूर्ण घरालाही बाधित करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात नाही. उपचार होत नसल्याने मग त्यांची परिस्थिती बिघडते आणि त्या अवस्थे ते रुग्णालयात येतात. आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची गरज त्यामुळे वाढली आहे. त्यामुळे मी माझ्या आरोग्य विभागालाही आवाहन केलं आहे की, ज्यांचं घर छोटं आहे, ज्यांना विलगीकरणात राहण शक्य नाही त्यांना सरळ सरकारी सीसीसी रुग्णालयात आणलं पाहिजे. होम आयसोलेशनमध्ये ठेवू नका, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हा एक महत्वाचा बदल झाला पाहिजे. लोकांनी तो पाळला पाहिजे,” असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.
कडक निर्बंध म्हणजे नेमकं काय करणार असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “जसं आपण सरकारी ऑफिसमध्ये ५० टक्के कर्मचारी घरुन काम करत आहेत तसंच खासगी कार्यालयांसाठीही करावं लागेल. त्यानंतर आपल्याला कदाचित रेस्तरॉ, चित्रपटगृह १०० टक्के बंद करावे लागतील का? गर्दीची ठिकाणं टाळण्याच्या हेतूने या काही गोष्टी कराव्या लागतात. पण जर लोक शिस्त पाळणार असतील तर नियम पाळा, लॉकडाउन टाळा हे धोरणं आहे. नियम कडक पाळले, संख्या रोखू शकलो तर लॉकडाउनची गरज नाही”.