जळगाव (प्रतिनिधी) दिवाळीसाठी पैसे आणि वस्तू हवे असल्याचे म्हणत घरात जबरदस्तीने शिरलेल्या वॉचमनने आरोही इंद्रकुमार ललवाणी (वय ३८, रा. बालाजी हाईट्स, मोहाडीरोड) या महिलेवर चाकूने वार केले. हल्ला करणारा संशयित गोकुळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) हा पुर्वी त्या बिल्डींगमध्ये वॉचमन म्हणून काम करीत होता. ही घटना दि. १३ रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजून गेली आहे.
शहरातील मोहाडी रोडवरील बालाजी हाईट्समध्ये आरोही इंद्रकुमार लालवणी या पतीसह वास्तव्यास आहे. त्यांच्या बिल्डींगमध्ये यापुर्वी गोकुळ राठोड हा वॉचमन म्हणून काम करीत होता. दि. १३ रोजी दुपारच्या सुमारास आरोही लालवाणी या घरी असतांना त्यांच्या दरवाजाची बेल वाजली. लालवाणी या दरवाजा उघडला असता, पुर्वी वॉचमन म्हणून काम करणारा गोकुळ राठोड हा उभा होता. त्याने पिण्यासाठी पाणी मागितल्याने लालवाणी यांनी त्याला पाणी दिले. त्यानंतर राठोड याने महिलेकडे त्यांच्या पतीचा मोबाईल क्रमांक मला काम हवे असून त्यांच्याकडून कामाची माहिती घेईल म्हणून मागितला.
दरवाजा लोटून घरात केला प्रवेश
संशयित हल्लेखोर वॉचमनने महिलेला तिच्या पतीचा मोबाईल क्रमांक मागितल्यानंतर त्याने पुन्हा पाणी मागितले. त्याच्याजवळ असलेला ग्लास घेण्याकरीता दरवाजा उघडला असता, संशयिताने दरवाजा लोटून मला दिवाळी करण्यासाठी पैसे व वस्तू हवे आहे असे म्हणत तो घाई करु लागला.
किचनमधील चाकूने केला महिलेवर हल्ला
घाई करीत घरात शिरलेल्या वॉचमनला महिला घराबाहेर काढत असतांना त्या संशयिताने किचनमधील चाकूने आरोही लालवाणी यांच्या हाताच्या पंजाच्यावर वार केले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या विद्या येवले, स्वेता पाटील, वॉचमन शिवदास राठोड व त्याची पत्नी सगुनाबाई राठोड हे तेथे आले. त्यांनी हल्लेखोर गोकुळ राठोड याला पकडून ठेवले असता तो त्यांच्यासोबत देखील झटापट करीत होता.
उपचारानंतर दिली पोलिसात तक्रार
घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या लालवाणी 1 यांनी घटनेची माहिती पतीला दिली. त्यानुसार त्यांचे पती हे लागलीच घरी आले. त्यांनी जखमी आरोही लालवाणी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी – नेले. त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांनी 1 एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित हल्लेखोर वॉचमन गोकुळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) याच्याविरुद्ध – गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
	    	
 
















