धरणगाव (प्रतिनिधी) क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांची जयंती व महिला शिक्षण दिन या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये सवित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
गुड शेपर्ड स्कुल मध्ये सवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम शाळेचे शाखा व्यवस्थापक जगन गावित व जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी यांनी माईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांनी देखील माईंना पुष्प अर्पण केलेत. दहावीच्या वर्गशिक्षिका भारती तिवारी यांनी सांगितले की ३ जानेवारी हा दिवस फक्त सवित्रीमाईं यांचा जन्मदिवस नसून ज्या माऊलीने आम्हा सर्व महिलांना ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला त्या माईंचा गौरव दिन व आम्हा महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान दिन आहे. शाळेतील शिक्षक सागर गायकवाड यांनी सवित्रीमाई फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. माईंनी शिक्षणाची क्रांती केली म्हणून सर्व समाजातील मुलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला, असेही त्यांनी सांगितले. क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले या दोन्ही फुले दाम्पत्यांनी शिक्षणाची क्रांती घडवून आणली. शेतकऱ्यांना व्यथा, स्रियांचे प्रश्न, वंचितांचे दुःख, केशवपन, बालहत्या प्रतिबंधक गृह यांसारख्या विविध क्षेत्रातील फुले दाम्पत्यांनी केलेली कामगिरी समाजप्रबोधन आणि समाजपरिवर्तन घडवून आणले. सवित्रीमाईंची जयंती महिला शिक्षण दिन, महिला मुक्ती दिन, बालिका दिन म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करावा, असे आवाहन लक्ष्मण पाटील यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाळेचे शाखा व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षक संतोष सूर्यवंशी, दहावीच्या वर्गशिक्षका भारती तिवारी, विज्ञान विषय शिक्षिका सपना पाटील, मराठीचे लक्ष्मण पाटील, सामाजिक शास्राचे सागर गायकवाड, क्रीडाशिक्षक अमोल सोनार, सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता ९ वी व १० वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल सोनार यांनी केले