धरणगाव (प्रतिनिधी) शहरात मंगळवार ते शनिवार जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय प्रांताधिकारी यांनी घेतला असून सर्व प्रकारचे कामे बंद राहतील असे जाहीर केले होते. पण शहरात फेव्हर ब्लॉकचे काम चालू आहे. गावात कोरोना सारख्या महामारीमुळे मृत्यूचे तांडव सुरु असल्यामुळे हे काम आजच्या आज बंद करावे, अन्यथा उद्या पासून दुकाने उघडण्यासाठी आवाहन करण्यात येईल, असा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे.
धरणगाव शहरात मंगळवार ते शनिवार जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय प्रांताधिकारी यांनी सर्व राजकीय पक्ष, व्यापारी बांधव, पत्रकार बंधू, यांच्या संमतीने जाहीर केले. परंतु व्यापारी बांधवांनी काही तक्रारी केल्या की, फक्त दुकानच बंद असतात रोड, रस्ते १५ ते २० मजुरांच्या ग्रुपने सुरु असतात. तेव्हा कोरोनाचा फैलाव होत नाही का?त्यावर प्रांताधिकारी गोसावी यांनी सर्व प्रकारचे कामे बंद राहतील असे जाहीर केले होते. तरी सुध्दा सत्तेचा माज असलेले ठेकेदार नगरसेवक ऐकायला तयार नाहीत. गावात कोरोना सारख्या महामारीमुळे मृत्यूचे तांडव चालू आहे, पाण्यासाठी वणवण सुरू आहे, व्यापारी बंदमुळे चिंतेत आहे, यांना मात्र पैसा कसा कमावता येईल यांची चिंता आहे. लोक मेले तरी चालेल. पण भारतीय जनता पार्टी असा अन्याय व्यापारी बांधवांवर होऊ देणार नाही.
तसेच शहरात डॉ. बाबासाहेब शॉपिंग कॉम्पलेक्स जवळील सुरू असलेले फेव्हर ब्लॉकचे काम आजच्या आज बंद झाले नाही तर उद्या पासून दुकाने उघडण्यासाठी आवाहन करण्यात येईल. प्रशासनाने संबंधित ठेकेदार, बांधकाम अभियंता व मुख्याधिकारी यांच्यावर कोरोना आपत्ती कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करावा व कोरोना वाढीस बढावा देत आहेत म्हणून निलंबित करावे. अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी भाजप शहराध्यक्ष, दिलीप महाजन, भाजप गटनेते कैलास माळी, ललित येवले, शरद अण्णा धनगर, गुलाबराव मराठे, कडुआप्पा बयस, भाजप नगसेवक भालचंद्र जाधव आदी उपस्थित होते.