धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार धरणगाव तालुक्यात आज ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातील ५८ रुग्ण एकट्या धरणगाव शहरात आढळून आले आहेत. तर दुसरीकडे एकुण बाधितांचा आकडा ३१७५ इतका झाला आहे.
धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात ११८ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यात धरणगाव शहर : ५८,
पिंप्री : १३, अहिरे : ८, पाळधी बु : ३, रेल : १, सावखेडा : १, पाळधी खु : ४, साळवा : ६, गारखेडा : २, कामतवाडी : १, खुर्दे बु : ५, गोंदगाव : २, साकरे : ७, बाभळे : २, आनोरा : २, बांभोरी बु : १, कल्याणेहोळ : १, लोणे : १, तर धरणगाव शहरात तब्बल ५८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात ३२९३ रूग्ण झाले असून यापैकी ५० रूग्ण मयत झाले. तर २५०६ रूग्ण बरे झाले असून उर्वरित ७३७ रूग्ण हे उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.