धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनातर्फे प्राप्त झालेल्या अहवालानुसार धरणगाव तालुक्यात आज १२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यातील ५३ रुग्ण एकट्या धरणगाव शहरात आढळून आले आहेत. तर दुसरीकडे एकुण बाधितांचा आकडा ३०५० इतका झाला आहे.
धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात १२५ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. त्यात धरणगाव शहर : ५३,
हिंगोणे ; ९, तरडे : ३, भवरखेडा : २, बांभोरी बु : २, पिंपळे : ३, कल्याणे खु : १, हनुमंतखेडा : १, गाढोदा : १, वाघूळद : ३, पिंप्री : १, सोनवद खु : १, झुरखेडा : १, पष्टाणे : १, अहिरे : ४, पाळधी खु : ५, पाळधी बु : ७, पोखरी : १, जळगाव (कर्मचारी) : १, चोपडा (कर्मचारी) : १, रिगणगाव (कर्मचारी) : १, भोद खु : १, जांभोरा : १, आनोरा : १, बाभळे : १, धानोरा : २, साकवा : १, गारखेडा : १६, तर धरणगाव शहरात तब्बल ५३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात ३१७५ रूग्ण झाले असून यापैकी ५० रूग्ण मयत झाले. तर २४९२ रूग्ण बरे झाले असून उर्वरित ६३३ रूग्ण हे उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.
















