जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – १३, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-२५, अमळनेर-०२, चोपडा-२५, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-०४, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०४, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ८० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार ३८६ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ५२२ रुग्ण सध्या उपचार घेताय.