मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील काही भागांतून कोरोनाची नवीन प्रकरणं सतत समोर येत असल्यामुळे शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने १३ इमारती सील केल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूच्या १० हजार ४८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३१३ रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत इमारती सील केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे निर्बंध लादले गेले नाहीत तर कोरोनाची प्रकरणं वाढू शकतात, असा धोका अधिकाऱ्यांना आहे. शनिवारी मुंबईत कोरोनाचे एकूण १९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत मुंबईतील रुग्णालयातून ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दरम्यान कोरोनाच्या ३७,६६१ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत १,२१,०८,८४६ नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या रिकवरी रेट ९७ टक्के आहे.
देशातील सध्याची कोरोना स्थिती
एकूण कोरोना रुग्णांची संख्या : 3,45,10,413
एकूण कोरोनामुक्तांची संख्या : 3,39,22,037
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या : 4,65,662
उपचाराधीन रग्णांची संख्या : 1,22,714
एकूण लसीकरण : 1,16,50,55,210