TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत मोहाडी येथील सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश

स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने श्रीमती वाघ यांनी मानले शासनाचे आभार

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणेसाठी २० नोव्हेंबर, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत राज्यात महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले. या अभियानातंर्गत बांधण्यात आलेल्या ३ लाख २२ हजार ९२९ घरकुलांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना घराची चावी देण्यात आली. तर या कार्यक्रमात जिल्ह्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून श्री. व सौ वाघ यांना घराची चावी व वृक्ष देऊन त्यांना घराचा ताबा देण्यात आला.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

या कार्यक्रमास मुंबई येथे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार आदि मान्यवर उपस्थित होते. तर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण‍ विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

सौ. रत्ना वाघ यांनी शासन व प्रशासनाचे मानले आभार

सुरुवातील आम्ही अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत होतो. स्वत:च्या घराचे स्वप्न होते. ते आज शासनामुळे पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आणि आज ई-गृहप्रवेश झाल्याचा आनंद आहे. याबद्दल मोहाडी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे सौ. रत्ना वाघ यांनी शासन आणि प्रशासनाचे यावेळी आभार मानले.

या लाभार्थ्यांना देण्यात आली घरकुलाची चावी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांचे लाभार्थी श्री. देवचंद सोनू सुर्यवंशी, संतोष पंडित वाघ, शांताराम रामा तायडे, श्रीमती गंगुबाई देवराम सोनवणे, ज्ञानेश्वर दौलत सोनवणे या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण‍ विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्या हस्ते घराची चावी व वृक्ष देऊन घराचा ताबा दिला.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ५४२५८ तर राज्य पुरस्कृत (रमाई, शबरी, पारधी) योजनेतंर्गत १७२८५ लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांपैकी ५१२३९ लाभार्थ्याना तर राज्य पुरस्कृत योजनांच्या मंजूर लाभार्थ्यांपैकी १५८६० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ३३६२७ तर राज्य पुरस्कृत योजनेतील १०३०९ घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेतील ७९६ प्रलंबित घरकुलांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात डेमो हाऊस बांधकाम पूर्ण झाले असून घरकुल मार्ट सुरु करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक लोखंडे यांनी यावेळी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

महाआवास अभियानाअंतर्गत ३ लाख २३ हजार लाभार्थ्यांनी केला गृहप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता ! आकाशातून पडला २ किलोचा सोनेरी दगड !

September 25, 2021

सीडी नक्की येणार, वाट बघा : एकनाथराव खडसे

February 4, 2022

पी. आर. हायस्कूल मध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू

December 10, 2020

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

March 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group