नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे कमी होत असताना मृत्यूंच प्रमाण अद्याप चार हजारांच्या पुढेच असल्याचं चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ११ हजार १७० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. याशिवाय ४,०३७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३,६२,४३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात काल दिवसभरात ३ लाख ११ हजार १७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या देशात ३६ लाख १८ हजार ४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ४,०३७ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
देशात झालेल्या एकूण ४,०३७ मृत्यूंपैकी ९६० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. सध्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी मृत्यूदर वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात काल ५९ हजार ७३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ३४ हजार ८४८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले
देशात रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर हा ८३.८३ टक्के आहे. भारतात नवीन कोरोना रुग्णांची संख्या पाच दिवसांत चौथ्यांदा बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. दहा राज्यांत बरे होण्याचा दर ७०.४९ टक्के आहे. देशात एकूण बळींची संख्या २ लाख ७० हजार २८४ आहे. तर एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ४६ लाख ८४ हजार ०७७ इतकी आहे.