धरणगाव (प्रतिनिधी) आरोग्यभारती च्यावतीने धरणगाव शहरातील बालकवी ठोंबरे शाळेच्या प्रांगणावर दि. १५ जून ते २१ जून योग सप्ताह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज २१ जून रोजी बाळासाहेब चौधरी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह) यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन व योग सप्ताह यांचा समारोप करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब चौधरी यांनी कोरोना महामारीच्या पार्शवभूमीवर योग व स्वस्थ जीवनशैली याचे महत्व विषद केले. तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब यांची वाढती संख्या ही देशाच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे ही सांगितले. आपल्या आरोग्याविषयी जागरूक करणाऱ्या आरोग्यभारती च्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी खूप कौतुक करून त्यांचा उत्साह वृद्धिंगत केला व असेच समाज कल्याणासाठी भविष्यात काम करण्याविषयी मार्गदर्शन केले. या योग सप्ताह शिबिरास योग शिक्षक सुदाम चौधरी व दिनेश पाटील यांनी योग स्थिती व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याची माहिती व प्रात्यक्षिके सर्वांकडून करून घेतली.
योग सप्ताहच्या यशस्वीतेसाठी डॉ. पंकज अमृतकर, डॉ. चेतन भावसार, डॉ. स्वप्नील पाटिल यांनी प्रयत्न केले. योग शिबिरास ज्येष्ठ स्वयंसेवक प्रमोद अमृतकर, लालाजी उपासनी, डॉ. रमेश पाटील, डॉ. शैलेश सूर्यवंशी, डॉ. मनोज अमृतकर उपस्थित होते. समारोपाचे सूत्रसंचालन डॉ. पुष्कर महाजन यांनी केले.