जळगाव प्रतिनिधी : मैत्रीणीसोबत शिरसोली रस्त्यावरील कुरुक्षेत्र टर्फ जवळ फिरण्यासाठी गेलेल्या आदित्य विलास चेके (वय २२, रा. श्रीधरनगर, मूळ रा. छत्रपती संभाजी नगर) या तरुणाला दि. ७ रोजी संशयित शेख रोशन शेख उस्मान (रा. तांबापुरा) याने दोघांना शिवीगाळकरीत मारहाण केली.
आदित्य विलास चेके याने त्याचा जाब विचारला असता लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित शेख रोशन शेख उस्मान याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ धनराज गुळवे हे करीत आहे.















