अमळनेर प्रतिनिधी । गावावरुन परस्पर ड्यिुटीला निघालेला तरुणाचा तालुक्यातील पिळोदा येथील पांझरा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुडी-वालखेडा पुलावर घडल्याची समजत आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक नाना पारधी (वय-२८) असे मृत तरुणाचे नाव असून तो (दि.२३) रोजी दुपारी ४ वाजता त्याच्या आजीला बुरझड ता. साक्री जि धुळे येथे भेटण्यासाठी गेला होता. दुसरा दिवशी तो सकाळी आपल्या ड्यिुटीवर येण्यासाठी मोटारसायकलने परत येत असताना मुडी ते वालखेडा दरम्यान असलेल्या पुलावर पांझरा नदीला पूर आल्याने पाणी वाहत होते. तरी देखील दीपकने मोटारसायकल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा तोल जाऊन मोटासायकल पुलाच्या दगडावर अडकून पडली. परंतु दीपक पाण्यात वाहून गेला. मुडी येथील प्रवीण कोळी व इतरांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले मात्र तो मयत झालेला होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.