जयपूर (वृत्तसंस्था) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) एका मित्राने आपल्या जवळच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पूर्ण नियोजन करून ही घटना घडवली आहे.
पिडीतेने सांगितल्याप्रमाणे आरोपीने तिच्यासोबत काहीतरी खाण्यासाठी आणले होते, त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध अवस्थेत तीच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी आरोपीने बलात्कारादरम्यान महिलेचे काही फोटोही काढले त्यानंतर याच फोटोवरून तिला ब्लॅकमेल केले. पतीला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने पिडीतेला दिली होती. या धमकीच्या आधारे सतत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अखेर याला कंटाळून पिडीतेने पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले.