धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विवरे येथे आज येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद व प्रमुख अतिथी व देणगीदारांचा सत्कार आयोजित केला होता. तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी यावेळी केले.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर तसेच शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पी. सी. पाटील, जिल्हा परिषद सदस्या माधुरीताई अत्तरदे, धरणगाव नपाचे मा. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, काँग्रेस प्रदेश सचिव डी. जी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, ओबीसी सेल भाजपा अध्यक्ष संजय महाजन, बाजार समितीचे मा. सभापती पुनीलाल महाजन, मा. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, ग्रंथालयाचे अध्यक्ष मोहन पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अरविंद देवरे, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, शहराध्यक्ष संभाजी कंखरे, पंचक्रोशीतील सर्व सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी गुलाबराव देवकर यांनी तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. अध्यात्माचा आचरण आचरण करण्याचा सल्ला दिला. गावाने चांगलं काम करून धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल गावकर्यांचे कौतुक केले. परिसराला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन सहकार्य केले पाहिजे, असे डी. जी. पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी धरणगाव ते भवरखेडा रोड मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रुंदीकरण तसेच दुरुस्ती केला जाईल. तसेच गावासाठी सामाजिक सभागृह मंजूर करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. पी. सी. पाटील यांनी खासदार उमेश पाटील यांच्यामार्फत केंद्राच्या योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. गुलाबराव वाघ यांनी पालकमंत्री मार्फत वेगवेगळ्या योजना मंजुरीसाठी पाठपुरावा करू तसेच गावाच्या एकी बद्दल कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर महाजन यांनी गावातील युवकांचे कौतुक करत संघटन व सिस्त प्रशंसनीय असल्याचे सांगतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँगेस तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी केले. तर आभार भाऊसाहेब चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व मंदिर उभारणीसाठी धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, साईनाथ माळी, गणेश पाटील, राजू भिल, गुलाब माळी, मेघराज पाटील, सुभाष माळी, किरण देशमुख, शालीग्राम पाटील, दिलीप पाटील, रमेश चौधरी, नगराज पाटील, गोकुळ पाटील, हिम्मत मिस्तरी, सुरेश पाटील, हिलाल पाटील, संदीप पाटील व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते.