जळगाव (प्रतिनिधी) हातउसनवारीने दिलेले पैसे परत तरमागितल्याचा राग आलने गोकुळ भिवा गोटे (वय ३६, रा. रामेश्वर कॉलनी) यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. तसेच फळे कापण्याच्या पट्टीने त्याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ रोजी साडेदहा वाजेच्या सुमारास महादेव मंदिराजवळील कॉम्पलेक्समध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीत गोकुळ गोटे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १९ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने हातउसनवारीने दिलेले तीन हजार रुपये सतिष उर्फ पिन्टू मोहन भदाणे याला परत मागितले. त्याचा राग आल्याने सतिष भदाणे याने गोकुळ गोटे याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील फळे कापण्याच्या पट्टीने गोकुळच्या दाढीवर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी गोकुळ गोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सतिष उर्फ पिन्टू मोहन भदाणे रा. महेरुण पोलीस चौकीच्या मागे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करीत आहे.