धरणगाव (प्रतिनिधी) सबजेलमधून जामिनावर सुटल्यानंतर घरी जातांना तरुणावर तिघांनी चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जखमी उमाकांत सुरेश पाटील (वय 38, रा. सुंदरपट्टी, अमळनेर) हा आज रोजी सबजेल जळगाव येथून जामीन झाल्याने जळगाव येथून परत अमळनेर येथे ट्रिपल सीट मोटरसायकल जात होता. दुपारी दोनच्या सुमारास चिंचपुरा गावाजवळ स्पीड ब्रेकरवर कोणीतरी दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात उमाकांत गंभीर झाला असून त्यांच्यावर अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे कळते. या घटनेबाबतच्या वृत्ताला पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, हल्लेखोर अमळनेर येथील असल्याची शक्यता वर्तवली जात असून पूर्ववैमन्यासातून झाल्याचेही बोलले जात आहे. धरणगाव पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरु केली आहे.