TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवाचार्य प. पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ”श्रुतमहोदधी” पदवीने सम्मान

वाकोद येथे जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने अभिनंदन समारोह

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

वाकोद (प्रतिनिधी) कृषी क्षेत्रात आपल्या कार्याचा जागतिक पातळीवर ठसा उमटविला असे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन हे ऋषभदेव यांच्या असी, मसी आणि कृषी या तिघांचे मोठे अनुयायी होते. आज जैन परिवाराची गंगोत्री असलेल्या वाकोद नगरीत हा अभिनंदन समारोह महत्त्वाचा समजतो. असे विचार प. पू. महेंद्रऋषीजी म. सा. यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. वाकोद येथील हिराहस्ती समाज मंदिरात प्रज्ञामहर्षी युवाचार्य प. पु. महेंद्रऋषीजी महाराज यांचा ”दिव्यपद सम्मान” समारोह ५ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास सेवादास दलीचंदजी जैन, कविवर्य ना. धों. महानोर, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, अशोक जैन, अमर जैन, प्रकाश समदडीया आदि मान्यवर उपस्थित होते. कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सर्व सूचनांचे पालन करण्यात आले. उपस्थित सर्वांच्या डोक्यावर राजस्थानी पगडी, तोंडावर मास्क व गळ्यात जैन रंग प्रतीक असलेले वस्त्र होते.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

प्रज्ञामहर्षि, आगमज्ञाता युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री. महेंद्रऋषीजी म. सा, उपप्रवर्तक परमपूज्य श्री. अक्षयऋषीजी म. सा. आदी ठाणा पाच यांचा जळगाववासियांना चातुर्मासाचा सहवास लाभला होता. चातुर्मास पश्चात जळगावहून विहार करून वाकोद येथे संत आदि ठाणा पाच विराजमान झाले. या औचित्याने जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघतर्फे युवाचार्य प. पू. महेंद्रऋषी महाराज यांना ”श्रुतमहोदधी” पदवी देऊन मानपत्र प्रदान करण्यात आले. सेवादास दलीचंदजी जैन, रमेश जैन यांच्याहस्ते संतद्वयांना चादर ओढण्यात आली. कान्हदेशशिरोमणी-उपप्रवर्तक अक्षयऋषी यांना ही आदरची चादर ओढण्यात आली.

आरंभी अपूर्वा राका, मीनल समदडीया, ममता कांकरिया यांनी मंगलाचरण म्हटले. प.पू. अचलऋषी महाराज, प्रकाश समदडीया, प.पू. अमृतऋषी महाराज, महावीर गोलेछा, हितमीत भाषी प.पू. हितेंद्रऋषी म. सा. ताराबाई डाकलिया, ईश्वरलालजी साबद्रा, नागपूर श्री संघाचे सदस्य कांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. जळगाव येथील श्राविका ताराबाई रेदासनी यांनी गीताच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या, तसेच मिनल समदडिया यांनीदेखील भाष्य केले.

कान्हदेश शिरोमणी उपप्रवर्तक अक्षयऋषी महाराज यांनी उपस्थित श्रावक-श्रावकांशी सुसंवाद साधला. जळगांववासिय भाग्यवान आहेत की प.पू. युवाचार्य महेंद्रऋषिजी म.सा. यांचा चातुर्मास लाभला. कोरोना महामारीमुळे युवाचार्य म.सा. यांना मर्यादा आल्या होत्या परंतु पुन्हा एकदा युवाचार्यजी यांनी चातुर्मास करावा अशी कान्हदेशवासी यांच्यावतीने विनंती केली. खरे तर जळगावाचा मंगल प्रवेश जळगाव येथून आरंभ झाला आणि समारोप श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद तसेच जिल्ह्याचे शेवटचे गाव शेंदुर्णी येथे झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सेवादास व जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य दलीचंद जैन यांनी देखील मनोगत व्यक्त केले. द्रव्य, क्षेत्र, कल, भाव या नुसार आपापल्या पद्धतीने सर्वांनी चातुर्मासमध्ये सेवा, कार्य केले. कोरोनामुळे आम्हाला फार काही जास्त करता आले नाही, परंतु प.पु. युवाचार्य महेंद्रऋषी यांचे विचार तंत्रज्ञानाचा उपयोग करून घराघरात पोहोचविता आले ही चांगली बाब दिसून आली. असे दलिचंदजी जैन म्हणाले.

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषी महाराज साहेब लिखित ‘मुनी गुणमंगलमाला’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकासाठी दीपकजी ओस्तवाल यांचे सहकार्य लाभले. मानपत्र वाचन नितीन चोपडा यांनी केले. अपूर्वा राका यांनी सूत्रसंचालन केले. हा समारोह पार पडल्यावर सर्व संतांनी पळसखेडा-सोयगाव औरंगाबाद जिल्ह्याकडे विहार केला. या कार्यक्रमाचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

शेजारी महिलेच्या आत्महत्येप्रकरणी सासू-सुनेची निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाचा विळखा : दिल्लीकरांच्या चिंतेत पुन्हा वाढ !

November 19, 2020

सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पती जबाबदार : सर्वोच्च न्यायालय

March 10, 2021

धक्कादायक : दोन वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे ; संतप्त नागरिकांनी दिला नराधमाला चोप !

April 14, 2022

तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट, आसाममध्ये १४ जणांना अटक !

August 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group