पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील वयोवृद्ध दुर्गाबाई यशवंत पाटील या आजींना वयोमानानुसार हिंडणेफिरणे होत नव्हते. जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांना ही गोष्ट निदर्शनास आली. आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांनी आजीबाईंना भाऊसो गुलाबराव पाटील फाऊंडेशनच्यावतीने व्हीलचेअर भेट दिली.
यावेळी आजीबाईंचा आनंद ओसंडून वाहत होता. याप्रसंगी सरपंच प्रकाश नाना पाटील, संजू महाराज, युवा सेना शहरप्रमुख आबा माळी, अनिल माळी, राकेश पाटील, सुभाष बापू पाटील, सुभाष नन्नवरे, गोपाल पाटील, रवी माळी उपस्थित होते.
















