जळगाव प्रतिनिधी । राज्यात लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांसह अनेक दिग्गजांना वाढीव वीजबिलाचा फटका बसला आहे. त्यातच आता भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीजबिलाचा चांगलाच फटका बसला आहे. एकनाथ खडसे यांना महावितरणने चार महिन्यांचे तब्बल १ लाख ४ हजारांचे वाढीव वीज बिल पाठवले आहे.
भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरामध्ये 1 लाख 4 हजार रुपयांचं बिल लाइट बिल आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने ते चकीत झाले. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करावी तसंच बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आली आहे. याविषयी बोलताना खडसे म्हणाले की, लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिलं अवास्तव आहेत. ही भरमसाठ वीज बिलन भरण्यासारखी असल्याचे ते म्हणाले आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये योग्य नसल्याचे ते म्हणाले. यासोबतच सरकारने अवास्तव बिलांची चौकशी केली करावी आणि बिलामध्ये सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.