जळगाव (प्रतिनिधी) शहरातील राजीव गांधी नगर मधील देवीच्या मंदिरासमोर असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये चालत असलेल्या सट्टा पेढीवर आज पोलिसांनी धाड टाकत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर रोकडसह मोबाईल, सट्टा जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एकूण २० हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना गुप्त माहिती मिळाली होती की, राजीव गांधी नगरमध्ये सट्टा जुगाराचा खेळ सुरू आहे. त्यानुसार त्यांनी एक पथक रवाना केले. पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता त्या ठिकाणी आकाश बुधन झनके (रा.समता नगर), देविदास पांडुरंग महाजन (रा.हरिविठ्ठल नगर) महेश भगवती प्रसाद वाजपेयी (रा.हरिविठ्ठल नगर) योगेश सिताराम उपाध्ये (रा.राजीवनगर) तसेच सट्टा लावणारा उखर्डू भिला लोंढे (रा.राजीव गांधी नगर) हे मिळून आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम, कॅल्क्युलेटर, पाट्या, १० हजार ५०० रुपयांची रोकड तर २० हजार३०० रुपये असा एकूण ऐवज मिळाला. यासंदर्भात रवींद्र सुखदेव मोतीराम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.