TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाथाभाऊंनी अखेर सोडलं मौन, थेट देवेंद्र फडणवीसांनाच केला सवाल

“एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ?”

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2020
in जळगाव, मुक्ताईनगर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून पक्षापासून दूर गेलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी अखेर मौन सोडत थेट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच सवाल केला आहे. सातत्याने राज्यातील पक्ष नेत्यांविषयी नाव न घेता आरोप करणाऱ्या खडसे यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला असून, त्यांना ‘ड्रायक्लीनर’ असे संबोधले आहे.

भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना थेट देवेंद्र फडणवीस यांनाच काही सवाल केले आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर खडसे हे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती. मात्र, आता खडसे यांनी थेट फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

READ ALSO

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

ते म्हणतात की “पक्षाकडे मी वारंवार हे सांगितलं आहे. ज्यांनी हे केलंय, त्यांच्याकडून याची उत्तर घ्या. ज्यांनी अशा स्वरूपाचे आरोप- प्रत्यारोप केले. ज्यांनी तिकीट देण्यामध्ये अडथळे निर्माण केले.ज्यांनी तिकीट देऊन हरवण्याचा प्रयत्न केला. याचे सारे पुरावे दिले आहेत. तर सहा महिने झाले निवडणूक होऊन, पक्ष त्यावर कार्यवाही का करत नाही. निदान आम्हाला बोलून तरी विचारा. मी पुरावे दिले आहेत. व्हिडीओ कॅसेट दिल्या आहेत.रेकॉर्डिंग दिलं आहे. वर्तमानपत्राची कात्रणं दिली आहेत. चंद्रकांत पाटील यांनी कारवाई करण्याचे मान्य केले होते. मग कारवाई करायला विलंब का होतोय,असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का?, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे विचारले पाहिजे. खरं असेल तर करा,” असे खडसे यांनी म्हटले आहे.

“देवेंद्रजींनी ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्या सर्वांना क्लीनचीट दिली. जो आला त्याला क्लीनचीट दिली. आमचा ड्रायक्लिनरच होता. त्याच्यामध्ये असं होतं की, जो कुणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेचच क्लीनचीट मिळायची. फक्त मी आलो आणि ते क्लीनचीट देऊ शकले नाहीत. म्हणजे आमच्या ड्रायक्लीनरकडे पण अशी काय कला होती, इतक्या लोकांना दिली पण मला देऊ शकले नाही. याचं कारण काय?, हे विचारण्याचा मला अधिकार आहे.त्यामुळे मी ते विचारतोय,”असं म्हणत खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
जळगाव

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

June 19, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
Next Post

"विकेल ते पिकेल" अभियानाचा गुरुवारी शुभारंभ; कृषि विभागाच्या यु-टयूब चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत सल्लागार समितीचे स्टेशन मास्टर यांना निवेदन !

September 1, 2022

क्रुझ ड्रग्स प्रकरण : आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, आर्यनची दिवाळी ‘मन्नत’वर

October 28, 2021

तरूणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण ; चार जणांविरुद्ध गुन्हा

August 24, 2021

अर्णव गोस्वामींच्या अटकेबद्दल अखेर सचिन वाझेने समितीसमोर दिली ‘ही’ माहिती

December 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group