बडोदा (वृत्तसंस्था) गुजरातमधील बडोद्यातील बावामाणपुरा परिसरात तीन मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.
बांधकाम सुरु असलेली ही तीन मजली इमारत आधीपासूनच एका बाजूला झुकलेली होती. याबाबत येथील लोकांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, इमारत कोसळल्याने येथील अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाताच बचावकार्यासाठी सर्व टीम घटनास्थळी पोहोचल्या. तसेच सध्या या इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.