साकळी ता. यावल (प्रतिनिधी) येथील विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रातील आयशानगर या भागात मध्यरात्री रात्री पोलिसांनी विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्या एका डंपरला जप्त केले असुन पोलीसांनी वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे रात्री १२.३० वाजेच्या वेळीस यावल शहरातील आयशानगर परिसरात वाहन क्रमांक (एम.एच १९, सी.वाय ४८६१) या चारचाकी वाहन टाटा डंपर चालक संतोष रतीलाल कोळी (वय ३१, रा. विदगाव) हा त्याच्याकडील वाहनातुन बेकायदेशीर विनापरवाना वाळुची वाहतुक करीत असतांना त्याला रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या सोबत सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान, पोलीस कर्मचारी राहुल रत्नाकर चौधरी, पोलीस कर्मचारी असलम खान दिलावर खान, सतिष भोई यांच्या पथकाने पकडले. त्यास पोलीसांनी वाहतुक परवान्याबाबत विचारले असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे वाहनचालकाने सांगीतले. त्यावरून यावल पोलीसांनी तात्काळ टाटा डंपर ताब्यात घेत याबाबत पोलीस कर्मचारी राहुल रत्नाकर चौधरी यांनी फिर्याद दाखल केली. संबधीत डंपरचालक संतोष रतीलाल कोळी विरुद्ध भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रशासनाच्यावतीने तहसीलदार हे या वाहनावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे वृत्त आहे. यावल शहरासह तालुक्यात मोठया प्रमाणावर बेकायदेशीररित्या दिवसाढवळ्या वाळुची वाहतुक होत आहे, हे पोलीसांनी कळते मग महसुल विभागाला का कळत नाही? असा प्रश्न नागरीक करीत आहे.