मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अँगलवर तपास करण्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची कसून चौकशी होत आहे. याप्रकरणी आज रियाला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) एक पथक आज सकाळीच रियाच्या घरी दाखल झाले आहे.
सकाळी सव्वाआठ वाजता एनसीबीचे पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाले आहे. यावेळी पथकासोबत पोलिस देखील होते. रियाला समन्स बजावण्यात आले असून तिला चौकसीसाठी सोबत येण्यासाठी सांगण्यात आले आहे. स्वतः चौकशीसाठी येणार की आमच्यासोबत असा पर्यायही एनसीबीने रियाला दिला. त्यानंतर तिने स्वतः हजर होऊ असे सांगितले असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार आता रियाला साडेदहा वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या पथकासमोर हजर राहावे लागणार आहे. रियाचा घराबाहेर प्रसारमाध्यमांचीही मोठी गर्दी झाली आहे. आता एनसीबी शौविक, सॅम्युअल, दिपेश आणि रियाला समोरासमोर बसवून चौकशी करु शकते. चौकशीनंतर रियाला अटक होण्याचीही शक्यता आहे.