जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे शुक्रवार दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी जळगाव जिल्हा दौ-यावर येत आहे.
शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी १:३० वाजता श्री. गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेड येथून चार्टड विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी २:३० वाजेच्या सुमारास चार्टड विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावकडे प्रयाण. दुपारी ३ वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी ३:३० ते ४ :३० वाजेपर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आढावा बैठक. (स्थळ – प्रशासकीय भवन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सायंकाळी ४:३० वा. पत्रकार परिषद (स्थळ – प्रशासकीय भवन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), सायंकाळी ५:३० वा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळ येथे आगमन व चार्टड विमानाने औरंगाबादकडे प्रयाण करणार आहेत.