जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-यांविरुध्द कारवाई करण्याचे अधिकार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व इंन्सिडंट कमांडर (Incident Commander) यांना प्रदान करण्यात आले आहे. तसे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.
कोविड-19 या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-या होलसेल, किरकोळ औषध विक्रेते, डॉक्टर्स, रुग्णालये व अन्य इतर संबंधित आस्थापना यांचेविरुध्द सापळा रचून अथवा अचानक धाडी टाकून सर्व इंन्सिडंट कमांडर (Incident Commander) व संबधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी औषधांचा काळाबाजार अथवा साठेबाजी होते अगर कसे, याची खात्री करावी. संबंधित ठिकाणी औषधाची साठेबाजी, काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याबाबतची सविस्तर माहिती सर्व इंन्सिडंट कमांडर व संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांनी औषधी निरीक्षक ( Drug Inspecter) अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांना तात्काळ द्यावी.
जळगाव जिल्ह्या वर नमूद केल्याप्रमाणे जर कोणी कोविड -19 शी संबंधित औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर भा.द.वि. कलम 420 जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 परिच्छेद 26 Drugs Price Control Order 2013 जीवनाश्यक वस्तू कायदा कलम 3 (2) (C) नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई औषध निरीक्षक (Drug Inspecter) अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांना तात्काळ करावी. जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी मालाचे किरकोळ व ठोक व्यापारी/दुकानदार यांनी त्यांच्याकडून विकल्या जाणा-या प्रत्येक औषधींची लेखी पावती (बील) प्रत्येक ग्राहकास देणे बंधनकारक आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व औषधी मालाचे किरकोळ व ठोक व्यापारी/दुकानदार यांनी ग्राहकास जादा दराने औषधांची विक्री करण्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द देखील भा.द.वि. कलम 420 जीवनाश्यक वस्तू कायदा 1955 परिच्छेद 26, Drugs Price Control Oder 2013 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 (2) (C) नुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई औषधी निरीक्षक (Drug Inspecter) अन्न व औषध प्रशासन यांनी तात्काळ करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव श्री. राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.