नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूपैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.
महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.