नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सदस्यांना मला विचारायचे आहे की एवढे लोक कसे काय बरे झाले? ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का? , अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे संसदेत बरसले.
देशातील करोना परिस्थितीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी संसदेत सविस्तर निवेदन केलं. आरोग्य मंत्र्यांच्या निवेदनावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संसद सदस्यांनी सवाल करत मोदी सरकारवर टीका केली. कोविडवर आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर झालेल्या चर्चेत संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांनी भाजपालाही टोला लगावला. लोक ‘भाभाजी पापड’ खाऊन बरे होतात, का असा सवालही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी हे पापड लाँच करत यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा दावा केला होता. यानंतर काही दिवसात हे मंत्री स्वतःच करोनाबाधित असल्याचं समोर आले. सदस्यांना मला विचारायचे आहे की एवढे लोक कसे काय बरे झाले? ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का? ही राजकीय लढाई नसून लोकांचे जीव वाचण्याची लढाई आहे’, असं संजय राऊत म्हणाले. तसेच संसदेत बोलताना संजय राऊत म्हणाले,”माझी आई आणि भावालाही करोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेने केलेल्या कामाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय,” असे संजय राऊत म्हणाले.