जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसा जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक जिल्हा स्तराव कोकणातील पूरग्रस्तांना विविध गरजू साहित्य देणार आहेत. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्त यांनी सुद्धा सढळ हस्ते मदत साहित्य द्यावे, अशी विनंती मनसेचे नेते माजी आमदार अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नविन अंतरवस्त्र, नविन बर्मुडा व टिशर्ट द्यावे. नविन अशासाठी प्रचंड ऊबट आहे. तसेच लाईट नसल्यामुळे घाम येत असून अॅलर्जी सारखे रोग होऊ नयेत म्हणून नवीन कपडे मागितले जात आहे. कपड्यांव्यतिरिक्त मेणबत्ती, काडीपेटी, टॉर्च, सेल फिनाईल, साबणं, खराटे, बारदाने, पाणी जार, कागदी थाळ्या, ग्लास, फूड-पॅकेट्स, ब्लैकेटस, पातळ चादर, टॉवेल, मोबाईल चार्जर, बिस्किट पुडे आदी साहित्य संकलनासाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
धुळे-
श्री. रावसाहेब कदम
मो.नं. ९८२२११४८४५ –
अॅड. दुष्यंतराजे देशमुख-
मो.नं- ९४०४५५८८५५
श्री. हितेंद्र महाले-
मो.नं- ९४२२२८६२००
श्री. बंटी सोनवणे- मो.नं. ९७६५५२९३५८
नंदुरबार
श्री. विजय चौधरी- मो.नं- ९८२२८२१७०५
श्री. अजय सोनवणे- तळोदा- मो.नं- ९३२५८३४०४०
जळगाव-
श्री.जमिल देशपांडे
मो. नं ९३७२००७४६५ –
श्री. आशिष सपकाळे- मो.नं. ९८६०५९७६१५
श्री. राजेंद्र निकम
मो. नं ९४२२७७७२३७,
तिन्ही जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटना, कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातुन ऐच्छिक दाते यांच्या कडून साहित्य जमा कार्यात सहकार्य करावे. जमा झालेले साहित्य विशिष्ट वाहनाद्वारे कोकण पूरग्रस्तांना पोहचविण्यात येईल अशी माहिती माजी आमदार मनसे नेते अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिली आहे.