जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीस्वार विना मास्क फिरत असतांना पोलिसांनी कारवाईसाठी थांबविल्यावर वाद घालणाऱ्या तरुणाला ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी टॉवर चौकातून एक दुचाकीस्वार तरुण विना मास्क आढळून आला. पोलिसांनी कारवाईसाठी त्याला अडवल्यानंतर त्याने वाद घालायला सुरुवात केली. एवढेच नव्ह तर मोबाइलमध्ये पोलिसांची शुटींग करायला लागला. त्यानंतर दंड भरण्यास नकार देत पोलिसांशी हुज्जत घालायला सुरूवात केली. यामुळे हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चूक मान्य केली. पोलिस निरीक्षक अरुण निकम यांनी तरुणास समज दिली आणि नंतर दंड भरण्यास सांगितले.