जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकात दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं:-१०२९/२०२० भा.द.वि.कलम ३०७,१४३,१४७,१४८ ,१४९,३३७ प्रमाणे दाखल आहे. ह्या गुन्ह्यातील फरार पैकी आरोपी नामे जब्बार शेख गफूर कुरेशी (वय ४९, रा. अकसा नगर, मेहरून जळगाव) हा मास्टर कॉलनी येथे असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक मुदस्सर काजी यांना मिळाली. गुप्त माहीती मिळाली होती की, आरोपी पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार त्याला दि. २३ सप्टेंबार रोजी रात्री सापळा रचून ताब्यात घेतले आहे. अटकेची कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील,सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. मुदस्सर काजी, पो.काॅ सचिन पाटील, योगेश बारी, अश्फाक शेख, यांनी केली असून पुढील तपास पीएसआय संदीप पाटील हे करीत आहेत.