TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाहिन्या आणि समाजमाध्यमांच्या ट्रेंडमागचे गणित…!

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

समीर गायकवाड : देशभरात जेंव्हा फक्त महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाच्या केसेसचे हॉटस्पॉट झाले होते, करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता तोपर्यंत हिंदी, इंग्रजी आणि मराठी (होय मराठीही) वृत्तवाहिन्यांच्या स्क्रीनवर चोवीस तासाची स्पेस केवळ आणि केवळ करोनाच्या बातम्यांना होती. अन्य बातम्यांना अगदी नगण्य स्थान होते.

 

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या आणि वाहिन्यांचं विशेष प्रेम असणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये 5 मार्च ते 11 जून या 99 दिवसात करोनाच्या केवळ 12088 केसेस होत्या. दिवसाला सव्वाशे अशी याची सरासरी होती. 12 जूनला यूपीमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात पाचशेहून अधिक रुग्ण आढळले. त्यानंतर हा आलेख चढता राहिला.

 

3 जुलै रोजी यूपीमध्ये विकास दुबे या गॅंगस्टरने आठ पोलिसांची नृशंस हत्या केली. त्या दिवशी पहिल्यांदाच युपीमधील करोनाने हजारचा टप्पा गाठला होता. 7 जुलै रोजीची युपीमधील करोनाच्या नव्या केसेसची संख्या होती 1332 ! या दिवसानंतर युपीचा करोनाचा आलेख प्रचंड वेगाने चढता राहिला. दहा जुलै रोजी विकास दुबे ठार मारला गेला. 9 जुलै ते 12 जुलै या काळात सर्व वृत्तवाहिन्यांत केवळ विकास दुबेच्या बातम्याना मोठी स्पेस होती. गंमत पुढे आहे.

 

14 जून रोजी कथित आत्महत्या झालेल्या सुशांतसिंह राजपूतबद्दल गायपट्ट्यातील राज्ये, हिंदी भाषक राज्ये आणि माध्यमे सुरुवातीला इतकी सक्रिय नव्हती. कोणत्याही हिंदी इंग्रजी मराठी वृत्तवाहिनीचे दैनंदिन तपशील पाहिले तर स्पष्ट लक्षात येईल की अगदी ठरवून मोहीम राबवल्याप्रमाणे 14 जुलैपासून या मुद्द्यास सगळीच स्पेस देऊन टाकली आहे. करोनाच्या बातम्यांना केवळ औपचारिकता म्हणून जागा ठेवली गेली.

 

इथे एक मुद्दा आणखी महत्वाचा आहे तो म्हणजे 11 जुलै रोजी धारावीमध्ये केवळ 11 नवे करोनारुग्ण आढळले होते. मुंबईमधील अक्राळविक्राळ करोनासंसर्ग आटोक्यात येऊ लागल्याचे पडघम वाजू लागले.

 

17 जुलैपासून दिल्लीमधील करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आलेख तर चक्क उतरतीला लागला. या दरम्यान 5 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बिहारमधील नद्यांना भयानक पूर आला. खरे तर तिथली स्थिती अत्यंत दयनीय झाली होती मात्र माध्यमे त्याची दखल घेण्यास तयार नव्हती. याच काळात सुशांतसिंह राजपूतच्या मुद्द्यास हाईप देण्यात आली.

11 जून रोजी निवडणूक आयोगाने सांगितले की बिहारमधील निवडणूका पुढे ढकलल्या जाणार नाहीत, त्या नियोजित काळातच होतील. दरम्यान तिथे व्हर्च्युअल प्रचार रॅली घेऊन चाचपण्या करण्यात आल्या ज्याचा निष्कर्ष नकारात्मक आला. करोना, पूरस्थिती आणि लॉकडाऊन काळात देशभरात बिहारी मजुरांचे झालेले हाल यांना तोंड देण्यास राज्य आणि देश पातळीवरील सरकारकडे कुठला मुद्दाच नव्हता. त्याची कमी सुशांतसिंह राजपूतच्या मुद्द्याने भरून निघाली.

 

याचे अप्रत्यक्ष लाभ असे झाले की सुरुवातीला जिथे करोनाचा अगदी नगण्य प्रादुर्भाव होता त्या राज्यात आता करोनामुळे मोठी आपत्ती ओढवली आहे मात्र माध्यमे त्याची दखल घेण्यास तयार नाहीत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये जेंव्हा करोनाचा संसर्ग तुफान चढत्या आलेखात होता तेंव्हा या माध्यमांनी केलेले वार्तांकन आठवले तरी तुम्हाला हा मुद्दा कळून येईल.

 

आता सर्वच वृत्तवाहिन्यांवर करोना हा केवळ आकडेवारीचा मुद्दा राहिला आहे. जगात किती, देशात किती आणि मृत्यू किती याची आकडेवारी दिली की वाहिन्या त्यांचं एसएसआरच्या मृत्यूचं भांडवल स्वरूप चिपाड चघळायला मोकळ्या !

 

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून बिहार, कर्नाटक, आंध्र, बंगाल, युपी, गुजरात इथे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत गेले. रुग्णदुप्पटीचे प्रमाण वाढते राहिले तर नेमक्या याच काळात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू येथील रुग्णदुप्पटीचे प्रमाण घटते राहिले.

 

आणखी एक महत्वाचा मुद्दा –


आतापावेतो प्रतिदशलक्ष लोकांमागे कोणत्या राज्याने किती करोना चाचण्या केल्या याचा एक आढावा खर्‍या अर्थाने डोळे उघडेल – सर्वात कमी चाचण्याची टक्केवारी असणाऱ्या पहिल्या दहा राज्यात अनुक्रमे मध्यप्रदेश, झारखंड, बंगाल, छत्तीसगढ, बिहार, उत्तरप्रदेश, चंडीगढ, मेघालय, तेलंगण, गुजरात ही राज्ये आहेत. यात मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, बंगाल आणि गुजरात ही आकारमानाने आणि लोकसंख्येने मोठी असलेली राज्ये आहेत. वाहिन्या आणि समाजमाध्यमे कोणते ट्रेंड चालवत आहेत आणि कशासाठी चालवत आहेत याचं उत्तर तुम्हाला एव्हाना मिळाले असेल.

 

तरीही आपण आणखी एक मुद्दा पाहू –

मध्यप्रदेशची करोना चाचणीची टक्केवारी देशात सर्वात कमी आहे 13.7 हजार !
या नंतर बंगाल 15.4 हजार, बिहार 18.6 हजार, उत्तरप्रदेश 19.1 हजार, गुजरात 23.8 हजार अशी क्रमवारी येते.
देशात अनेक मुद्द्यांवर मागासलेली राज्ये या राज्यांच्या पेक्षा किती तरी अधिक पटीने पुढे गेली आहेत याचे कुणाला काहीच सोयरसुतक वाटत नसावे हे क्लेशदायक आहे.

 

या राज्यांची लोकसंख्या – उत्तरप्रदेश 22 कोटी 49 लाख, बिहार 11 कोटी 95 लाख, बंगाल 9 कोटी 69 लाख, मध्यप्रदेश – 8 कोटी 22 लाख, गुजरात 6 कोटी 79 लाख ! या पाच राज्यांची लोकसंख्या येते 59 कोटी 14 लाख ! म्हणजे देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या या राज्यात आहे आणि इथे करोनाच्या चाचण्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. जी राज्ये चाचण्या घेण्यात आघाडीवर आहेत त्यांच्या प्रमाणेच या राज्यातही जर चाचण्या केल्या गेल्या तर देशातील करोना बाधितांचा आकडा दुप्पट होईल हे कुणीही सांगू शकतो मात्र माध्यमांना ते सांगायचे नाही.

 

माध्यमांना काही बातम्या झाकून ठेवण्यासाठी काही बातम्यांना हवा द्यायला लागते आणि जनतादेखील त्याच मार्गाने मेंढरागत मागे यावी यासाठी सर्वांच्या लाडक्या सोशल मीडियावरही याचेच ट्रेंड चालवले जातात तेंव्हा बातमीमागची पार्श्वभूमी आपल्यापासून कोसो दूर असते.

 

आपण काय पाहायचे हे कुणाला ठरवू देऊ नये, आपल्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा नेहमीच जागृत ठेवावी. सुशांतसिंहच्या प्रकरणाचा तपास व्हायलाच हवा मात्र सध्या देशात तोच एक राष्ट्रव्यापी मुद्दा आहे का याचेही भान आपल्याला असायला हवे, आपल्या देशात अन्य काही आपत्ती, प्रश्न नाहीत का हे आपण स्वतःला विचारायला हवे. आपण ट्रेंडमध्ये वाहत जायचे की ट्रेंड का चालवले जाताहेत याचा शोध घ्यायचा हे सर्वस्वी आपल्या हाती आहे. याचे गणित सोडवायचे की नाही हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.

 

समीर गायकवाड यांच्या ब्लॉगवरून साभार 

 

(लेखक राज्यातील प्रसिद्ध ब्लॉगर आहेत)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलचा ठरला फॉर्मुला ; आज होणार अधिकृत घोषणा !

October 10, 2021

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि असोसिएट्स !

November 12, 2023

भुजबळांची निर्दोष मुक्तता ; अंजली दमानिया देणार हायकोर्टात आव्हान

September 9, 2021

पूरग्रस्त कोकणात मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार : अॅड. जयप्रकाश बाविस्कर

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group