TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सातव्या संशयित आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणातील सातवा संशयित आरोपी शशिकांत सुनील पवार याला आज धरणगाव कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी केली.

थोडक्यात घटना आणि अटकेतील आरोपींची नावे

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ २६ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवत चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी १) नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता अमळनेर जि.जळगाव) २) कुणाल उर्फ बंटी सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट शनिपेठ, जळगाव), ३) विक्रम राजु सारवान (वय ३२ वर्षे रा. गुरु नानक नगर, शनिपेठ जळगाव) ,४) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) , ५) सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ६) अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत सर्वाना अटक करण्यात आली आहे. यातील नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात आधीच समोर आले आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी आज शशी पवार (वय. ३६ रा. श्रद्धा कॉलनीजवळ,सुरेशनगर, महाबळ, जळगाव) याला बुधवारी चौकशीअंती ताब्यात घेण्यात आले होते. त्याला आज धरणगाव न्यायलयात हजर केले असता त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, शशी महापालिकेचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

तांत्रीक पुरावे निष्पन्न झाल्यानंतरच शशिकांतला अटक

सदर गुन्हयातील आरोपी शशिकांत पवार याच्या विरुध्द गुन्हयाच्या तपासात मिळुन आलेले तांत्रीक पुरावे तसेच अटकेतील सर्व आरोपींनी प्राथमिक तपासात दिलेल्या माहीतीवरुन शशीकांतचा या गुन्हयाच्या कटात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपी शशीकांतकडून घटनेच्या दिवशी गुन्हयात वापरलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल मधील सिमकार्डचे एसडीआर बाबत खात्री करुन तसेच मिळालेल्या इतर साक्षीदारच्या जबाबाच्या अनुषंगाने तांत्रीक पुरावे निष्पन्न केल्यानंतरच शशिकांतला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरु असून आरोपीतांचे मोबाईल क्रमांकाचे सीडीआर व एसडीआर रिपोर्टचे अधिकृत / प्रमाणित प्रती प्राप्त करुन गुन्हयाचा कागदपत्र तयार करण्याच्या कामाला आता वेग येणार आहे.

मोबाईलमुळे गोत्यात आला शशीकांत

 

नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात आधीच समोर आले आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी बुधवारी शशीकांत पवार याला ताब्यात घेतले असून शशीकांत हा नटवरचा नातेवाईक असल्याचे कळते. पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जळगाव शहर पोलीस स्थानका जवळील पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार नटवर आणि शशीकांत एकत्र होते. हे दोघंच या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात आता समोर येत आहे.

 

शशीकांतने केली मोबाईलची व्यवस्था आणि मदतीला दिले दोन जण

 

पोलीस तपासानुसार नटवरला प्रजापतने टीप दिल्यानंतर तो शशीकांतला भेटला. त्यानंतर शशीकांतने त्याचे मित्र सनी आणि विक्रमला या गुन्ह्यात नटवरला मदत करण्यास सांगितले. तसेच विक्रमकडे बांभोरीजवळ आपला मोबाईल दिला. त्यानंतर शशीकांत घरी गेला तर इतर चौघांनी स्वप्नील शिंपी यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. पाठलाग करत असतांना आरोपी मोबाईलवर सतत एकमेकाच्या संपर्कात होते. पोलिसांनी पद्धतशीरपणे मोबाईचा डाटा गोळा करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

 

विक्रम आणि शशीकांत असे आले गोत्यात

 

शशी आणि विक्रम हे एकमेकाला ओळखतात. विक्रम आणि सनी ज्या दुचाकीवरून घटनास्थळी पोहचले होते. ती दुचाकी दुसऱ्याची होती. पोलिसांनी संबंधित दुचाकी मालकाला शोधून काढले. दुचाकी मालकाने आपण दुचाकी सनी आणि विक्रमला दिली असल्याचे सांगितले. तर विक्रमने मला शशीकांतने मोबाईल दिला होता, असे चौकशीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा पद्धतीने विक्रम आणि शशीकांत टप्प्या-टप्प्याने गोत्यात आले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीन मोटारसायकली देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यात फिर्यादीत नमूद असलेली होंडा युनिकॉन मोटारसायकलचा देखील समावेश आहे. तर गुन्ह्यात वापरलेले हत्यार अर्थात चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

 

काय होती नेमकी घटना?

 

जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

जळगाव जि.प.च्या वरिष्ठ लिपिकाला लाच घेतांना एसीबीने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन !

November 28, 2023

जिल्ह्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित ; ३१ रुग्ण निगेटिव्ह !

November 26, 2020

जिल्ह्यात आज आढळले ३३ कोरोनाबाधित, ५२ झाले बरे !

January 24, 2021

निमखेडी शिवरात स्ट्रीट लाईट बसणार आणि पोलिसांची गस्तही वाढणार ; अॅड.कुणाल पवार यांच्या मागणीला यश

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group