जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिसांनी शहरातील गवळी वाडा, मोहाडी रोड परिसरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गवळी वाडा, मोहाडी रोड परिसरात बेकायदेशीर देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती निरिक्षक विनायक लोकरे यांनी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, पोहेकॉ सचिन पाटील, इमरान अली, इमरान अली, मुकेश पाटील, होमगार्ड धिरज भगत, भारती पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. एमआयडीच्या पथकाने राखी जनार्दन नेतलेकर या महिलेकडून २ हजार १८४ रूपये किंमतीची देशी दारू तर सुष्मा रवि बाटुंगे (रा. गवळीवाडा) हिच्या ताब्यातून २ हजार ९०० रूपये किंमतीचे गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.