TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 3651 प्रतिबंधीत क्षेत्र

दीड लाख संशयितांच्या चाचण्या पूर्ण, 23 हजारापेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत 3 हजार 651 प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची चाचणी करुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर उपाय म्हणून प्रशासनातर्फे संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. एका दिवसात (7 सप्टेंबर रोजी) 4 हजार 85 संशयित व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 284 इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. परंतु जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या 9 हजार 398 बाधित रुग्णांपैकी 8 हजार 154 रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जावू नये तर जागरुक राहून आपल्या कुटूंबात कुणालाही कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी नागरीकांना केले आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 1 लाख 49 हजार 284 चाचण्यांपैकी 1 लाख 14 हजार 267 अहवाल निगेटिव्ह तर 33 हजार 618 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण हे 22.51 टक्के इतके आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 23 हजार 433 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 69.43 टक्के इतके वाढले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याबरोबर त्याचे रहिवासी भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून या परिसराचे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमार्फत निर्जतुकीकरण करण्यात येते. तसेच या भागातील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात 1490, जिल्ह्यातील नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात 1053 तर जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 1108 भाग हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या भागात शासनाच्या नियमांचे व्यवस्थित पालन होत आहे किंवा कसे याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करण्यात येत असून तेथील ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट या त्रीसुत्रीनुसार गृह विलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांशी व नागरीकांशी संवाद साधण्यात येऊन त्यांना शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहनही या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेस सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधी नवविवाहित दाम्पत्य मृत्यू प्रकरण : दोन्ही गटातील तीन आरोपींना जामीन मंजूर !

January 13, 2021

सायकलस्वार कोरोना योध्याचा महापौरांकडून सन्मान !

April 23, 2021

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026

महाराजस्व अभियानाअंतर्गत पिंप्रीत फेरफार अदालत !

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group