TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा दूध संघ निवडणूक : सर्वपक्षीय पॅनलच्या शक्यता वाढल्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter


जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध संघातील निवडणुकीची चुरस काहीशी मंदावलेची स्थिती आजच्या घडीला निर्माण झाली आहे. भाजप शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेते सर्वपक्षीय पॅनलसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.दूध संघातील निवडणुकीत त माघारीला अवघा सोमवारचा दिवस शिल्लक असताना जोरदार घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील काही बडे नेते सर्वपक्षीय पॅनलसाठी पुन्हा एकदा आग्रही असल्याचे कळते. त्यामुळे गुप्त भेटी आणि फोनवरून एकमेकांना संपर्क करत माघारी बाबत तोडजोडी सुरू असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत काही दिवसांपासून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्यातील आरोप प्रत्यारोपाने तर थेट कौटुंबिक पातळी गाठली होती. या दोघं नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपामुळे दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. परंतु आज सकाळपासून अचानक वातावरण बदलले असून काही बडे नेते सर्व पक्षीय पॅनलसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. निवडणूक झाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक नियोजन करावे लागणार असल्यामुळे दिग्गज नेते निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे सर्वपक्षीय पॅनलवरून दोन्ही गटांमध्ये दोन दोन गट पडल्याचे कळते. भाजपा-शिंदे गटातील एक गट सर्वपक्षीय पॅनलसाठी तर दुसरा गट निवडणुकीसाठी आग्रही आहे. अगदी हीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये देखील असल्याचे कळते.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीतून माघार घेण्याकरीता आता केवळ एक दिवस शिल्लक असल्याने माघारी संदर्भात महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे-गटाने बैठका, मेळावे घेवून शुक्रवारी दिवसभर चर्चा केल्यात. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलची आशा धुसर झाली होती. परंतु आज सकाळपासून अचानक वातावरण बदलले असून सर्वपक्षीय पॅनल होण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या २० जागांसाठी दि. १० रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा पुन्हा एकदा प्रयोग केला जाणार होता. मात्र, भाजप आणि शिंदे गटाने खडसे नको हा नारा दिल्याने राष्ट्रवादीदेखील एक पाऊल मागे सरकली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि आ. मंगेश चव्हाण यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनलच्या आशा धुसर झाल्या होत्या. त्यामुळे, भाजपा शिंदे गट विरुध्द महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत पहायला मिळणार असे जवळपास निश्चित मानले जात होते. परंतु आज सकाळपासून अचानक वातावरण बदलले असून दोन आजी-माजी मंत्री सर्वपक्षीय पॅनलच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करत असल्याचे कळते.

एकीकडे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याकरीता केवळ सोमवारचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे एका दिवसात उमेदवारांचे अर्ज माघार कसे घ्यायचे? याबाबत उमेदवारांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्याकरीता हालचाली सुरू असताना दुसरीकडे मात्र सर्वपक्षीय पॅनलची देखील मोर्चेबांधणी पुन्हा एकदा जोराने सुरू असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : खडसेंविरुद्ध मी निवडणूक लढणारच ; आमदार मंगेशदादा चव्हाण यांची ठाम भूमिका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव चोपडा रोडवर एसटी बस अपघात ; एक ठार, चालक गंभीर जखमी !

December 14, 2024

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार ६ मे २०२२ !

May 6, 2022

धरणगावर पसरली शोककळा ; राजेंद्र महाजन यांचे दु:खद निधन !

September 11, 2022

व्यायामासाठी निघालेल्या कजगावचा तरुण अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार !

January 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...