धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात २६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण २६ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात पाळधी बुद्रुक ८, पाळधी खुर्द ६, टहाकळी, दोनगाव बुद्रूक प्रत्येकी एक तर झुरखेडा येथे १०, असे एकूण २६ कोरोनाबाधित रुग्ण आज तालुक्यात आढळून आले आहेत. आजचे २६ रूग्ण पकडून तालुक्यात १६३९ रूग्ण झाले असून यापैकी ४४ रूग्ण मयत झाले, १३२० रूग्ण बरे झाले असून उर्वरित २७५ रूग्ण हे उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.