धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल आज (दि.१७) प्रशासनाला प्राप्त झाले. त्यानुसार तालुक्यात तब्बल ३० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकूण ३० रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात नांदेड ३, एकलग्न १, पाळधी बुद्रुक १, साकरे १,अंजनविहिरे २, मोरया नगर १, खत्री गल्ली १, संजय नगर १, रोटवद १, उखळवाडी १,झुरखेडे ३, साळवा २, पाळधी खुर्द २, वाणी गल्ली २, लहान माळीवाडा १, कासार गल्ली १, पारधीवाडा १, वाघळूद खुर्द २, वराड बुद्रुक ३ असे एकूण ३० कोरोनाबाधित रुग्ण आज तालुक्यात आढळून आले आहेत. आजचे ३० रूग्ण पकडून तालुक्यात १७७९ रूग्ण झाले असून यापैकी ४५ रूग्ण मयत झाले. तर १४५५ रूग्ण बरे झाले असून उर्वरित २७९ रूग्ण हे उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.