बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात अजूनही लंपी विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव जनावरांत आहे. अश्या बाधित जनावरांना होमिओपॅथी औषधांचा फायदा होतो, असे हे औषध आपल्या गुरांना दिल्यावर पशुपालकांचा अनुभव आहे.
सुरत येथील गोमाता सेवा परिवारातर्फे हे निशुल्क होमिओपॅथिक औषध देत देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे तेराशे बाटली औषध बोदवड येथील डॉ. प्रदीपकुमार अग्रवाल यांनी पशुपालकांना दिले आहेत. तरी ज्या पशुपालकांच्या गुरांना लंपी प्रादुर्भाव झाला असेल त्यांनी .यासाठी श्री अरुण कृषी केंद्र,डॉ.आंबेडकर चौक गौरीशंकर व्यापारी संकुल जवळ ,९४२३१५८९३१ येथून हे औषध आपल्या पशुधनासाठी घेऊन जावे, असे आवाहन डॉ. प्रदीपकुमार अग्रवाल यांनी केले आहे.