भडगाव (प्रतिनिधी) मोटार सायकलचे पंचर काढायला जाणे दोन मुलांच्या जीवावर बितल्याची घटना भडगावात घडली आहे. पंचर मोटार सायकल ढकलत असताना समोरून येणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
भडगावच्या यशवंतनगर भागात दीपक वसंत सोनवणे (वय ४६) हे वास्तव्यास आहे. त्यांची मोटार सायकल क्र. (एम.१९ सीसी ४३७५) ही १५ फेब्रुवारी रोजी पंचर झाली होती. सोनवणे यांचा मुलगा अमोल दिपक सोनवणे (वय १५ वर्षे ) व त्याचा मित्र पंकज भारत भोई (रा. भोईवाडा) भडगाव असे दोघं जण मोटार सायकल ढकलत नेऊन पंचर काढण्यासाठी जात होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या अलीकडेस हॉटेल राज पॅलेस जवळ समोरून येणाऱ्या ईको गाडी (क्र. एमएच २७ एसी ६८४३ वरील चालक नाव गाव माहित नाही) याने मोटारसायकलीस समोरुन धडक दिली. या धडकेत अमोल जागीच गतप्राण झाला तर जखमी अमोलचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. याप्रकरणी इको कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय जाधव हे करीत आहे.