रायगड (वृत्तसंस्था) रायगड येथे मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथे घडली.
पीडित १६ वर्षीय आदिवासी मुलगी सध्या पाली येथील डहाणू या बिल्डिंगमध्ये बांधकाम मजुरीचे काम करत होती. तेथील ठेकेदार नितीन महादू पाटील (वय ३४) हा सुद्धा तेथे काम करत होता. ठेकेदाराने १ जानेवारी २०१९ ते ६ ऑक्टोबर २०२० या कालावधीत पाली बल्लाळेश्वर मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत अल्पवयीन आदिवासी मजूर मुलीवर वारंवार बलात्कार केला. या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. पोलिसांनी आरोपी ठेकेदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात बलात्कार, अॅट्रोसिटी आणि पॉस्को अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.