धरणगाव (वृत्तसंस्था) तालुका युवा शारीरिक शिक्षण व क्रिडा शिक्षक महासंघाची सभा नुकतीच पार पडली. या सभेमध्ये अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी संदेश हिरामण महानुभाव (सर्वज्ञ मा.वि. बोरगांव बु॥) तर सचिवपदी हेमंत ज्ञानेश्वर माळी ( म.फुले हायस्कुल धरणगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष एन.वाय. पाटील ( ज्ञानप्रबोधनी मा.वि. रोटवद ), कार्याध्यक्ष मनोज डी. परदेशी ( प.रा.विद्यालय धरणगाव ), सहसचिव हेमंत आर. महाजन ( बी.जे. मा.वि. अनोरे), जितेंद्र एस.ओस्तवाल ( कला, वाणिज्य महाविद्यालय धरणगाव ), खजिनदार सल्लागार फिलीप एफ. गावित (आदर्श मा.वि. धरणगाव), मुस्ताक अली मोहब्बत अली (अॅग्लो उर्दु हाय. धरणगाव), अमोल बी. सोनार (गुडशेफर्ड इंग्लीश स्कुल धरणगाव), बाळकृष्ण व्ही. बोरसे (ना.काबरे विद्यालय सोनवद),पवन सुनिल बारी (लिटल ब्लाझम स्कुल धरणगाव), यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. तालुका क्रिडा समन्वयक सचिन एल. सुर्यवंशी (सा. दा. कुडे विद्या. धरणगाव) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. सर्व कार्यकारिणीचे महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर, सचिव राजेश जी जाधव, कै. य. ब. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल संचलित, सर्वज्ञ मा.विद्या.बोरगांव बु॥चे अध्यक्ष प्रभाकर यशवंत पाटील, मुख्याध्यापक सी.पी. शेवाळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.