धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आनोरे येथील कै.बि.जे.महाजन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्ही ॲपचा योग्य वापर केल्याने त्यांना तालुकास्तरावर गौरवण्यात आले आहे. यात इयत्ता दहावीचा विद्यार्थी आशिष जगन सौसुत्या याने तालुक्यात प्रथम तर यश हरी महाजन या विद्यार्थ्यांचा तालुक्यात तृतीय क्रमांक आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना अभिनंदन पत्र देऊन पंचायत समिती शैक्षणिक विभागात गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांचा देखील गौरव करण्यात आला.पिपल असोसिएशन पुणे व जळगाव जिल्हा परिषदेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एम एच चौधरी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील ,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी पालकांसहित विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी आशिष सौसुत्या याचे वडील जगन सौसुत्या तसेच यश महाजन याचे वडील हरी महाजन, आई मनीषा महाजन उपस्थित होते. यश महाजन याची आई मनीषा महाजन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून वडील हरी तुकाराम महाजन हे विमा प्रतिनिधी आहेत. तर आशिष सौसुत्या याचे वडील शेतमजूर आहेत. या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.