जळगाव (प्रतिनिधी) अवघ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवण्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील ब्रुक बॉंड कॉलनीत घडली. दरम्यान, अवघ्या १३ वर्षाच्या मुलालाने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे.
जळगाव शहरातील ब्रुक बॉंड कॉलनीत राहणारे भोई दाम्पत्य चहा नास्त्याची गाडी लावून चरितार्थ चालवतात. आज दुपारी घरात कोणीच नसताना भूषण (वय १३) याने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाने उचललेल्या या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.